
डॉ. यतीन जाधव ‘लोटिस्मा’ अध्यक्षपदी;कार्याध्यक्षपदी अरुण इंगवले यांची निवड१६२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेतसंचालक मंडळाची नवीन कार्यकारिणी जाहीर.
चिपळूण : चिपळूणमधील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर (लोटिस्मा) या नामांकित सांस्कृतिक संस्थेच्या १६२व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत संस्थेच्या अध्यक्षपदी डॉ. यतीन जाधव, तर कार्याध्यक्षपदी भाषा अभ्यासक आणि कवी अरुण इंगवले यांची एकमताने निवड करण्यात आली. ही निवड पुढील पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी (२०२५ ते २०३०) केली गेली आहे.वाचनालयाच्या बाळशास्त्री जांभेकर सभागृहात पार पडलेल्या या सभेसाठी सभासदांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
शतकोत्तर सुवर्ण महोत्सव साजरा करून पुढील वाटचालीसाठी सज्ज झालेल्या संस्थेच्या या महत्त्वपूर्ण बैठकीत, भूतपूर्व अध्यक्ष डॉ. यतीन जाधव, कार्यवाह विनायक ओक आणि धनंजय चितळे व्यासपीठावर उपस्थित होते. सभेच्या अध्यक्षस्थानी डॉ. तानाजीराव चोरगे होते.सभेतील इतिवृत्त अहवाल आणि अंदाजपत्रक एकमताने संमत झाल्यानंतर संचालक मंडळाच्या निवडीची कार्यवाही सुरू झाली. अधिकारी मंडळासाठी संस्थेचे आजीव सदस्य राजेश जोष्टे यांनी ठराव मांडला.
त्यानुसार अध्यक्षपदी डॉ. यतीन अरविंद जाधव यांच्यासह, सुनील मधुकर खेडेकर, राष्ट्रपाल भागुराम सावंत आणि मिलिंद गिरीश गोखले यांची नावे सुचविण्यात आली व ती सर्वानुमते स्वीकारण्यात आली.कार्यकारिणीच्या निवडीत प्रकाश उर्फ बापूसाहेब काणे यांनी ठराव मांडला. त्यानुसार पुढील सदस्यांची निवड करण्यात आली. अरुण इंगवले (कार्याध्यक्ष), विनायक ओक, धीरज वाटेकर, श्रीराम दांडेकर, मनीषा दामले, अभिजीत देशमाने, सुबोध दीक्षित, मानसी पटवर्धन, आराध्या यादव, स्वरदा कुलकर्णी, धनंजय चितळे. आय-व्यय निरीक्षकपदी मंगेश बापट यांची नियुक्ती करण्यात आली. lotisma lokmanyatilaksmarakvachanmandirchiplun