हर्णै बंदरातील पारंपरिक मच्छिमार २२ मार्चपासून साखळी उपोषणाला
एलईडी पर्ससीन नेट मासेमारीमुळे पारंपरिक मच्छिमारांचे कंबरडे मोडले आहे. भविष्यात पारंपरिक मच्छिमारांवर उपासमारीची वेळ आली आहे. ही वेळ केवळ एलईडी मासेमारीमुळेच आली असल्याने तत्काळ तांत्रिक मासेमारी बंद करावी, अशी मागणी पारंपरिक मच्छिमारांमधून जोर धरत आहे. याविराेधात हर्णै बंदरातील पारंपरिक मच्छिमारांनी २२ मार्चपासून साखळी उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे. याबाबतचे निवेदन मच्छिमारांतर्फे तहसीलदार वैशाली पाटील यांना देण्यात आले आहे
www.konkantoday.com