मुंबईत प्रमुख मार्गांवर पालिकेच्या माध्यमातून आता ‘टॉयलेट ऑन व्हिल’ उपक्रम
मुंबईत प्रमुख मार्गांवर पालिकेच्या माध्यमातून ‘टॉयलेट ऑन व्हिल’ उपक्रम राबविण्यात येणार आहे. ‘झोन-7’मध्ये कांदिवली, बोरिवली आणि दहिसर विभागात महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज या उपक्रमाचा आढावा घेऊन दहा जागा निश्चित केल्या. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
मुंबईत द्रुतगती महामार्ग आणि मुख्य रस्त्यांच्या ठिकाणी पुरेशा प्रमाणात शौचालयांची व्यवस्था नसल्यामुळे प्रवासी, नागरिक आणि बाहेरगावहून येणाऱया प्रवाशांची गैरसोय होते. या पार्श्वभूमीवर पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून आणि महापौर किशोरी पेडणेकर यांच्या पुढाकाराने पालिका हा उपक्रम राबवत आहे.
www.konoantoday.com