नाचणे गोडाऊन स्टाॅप येथील श्रद्धा सबुरी स्वयंसहायता महिला बचतगटाच्या वतीने आशादिप या मतिमंदांच्या संस्थेला नित्योपयोगी वस्तुची देणगी
नाचणे गोडाऊन स्टाॅप येथील श्रद्धा सबुरी स्वयंसहायता महिला बचतगटाच्या ” श्री साईं श्रध्दा भेळ व वड़ापाव सेंटर ” या व्यवसायाला काल २० मार्च रोजी १३ वर्ष पूर्ण झाली त्यानिमित्त सकाळी श्री साईं मंदिरात जाऊन श्री बाबांच्या चरणी सर्व सदस्यानी आशिर्वाद घेतले त्यानंतर आपली सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊन या वर्धापन दिनानिमित्त आशादिप या मतिमंदांच्या संस्थेला नित्योपयोगी वस्तु यामधे अंगाचे,कपड्याचे साबण ,टूथपेस्ट,पार्लेजी बिस्किट टुडे, साखर तेल ” अशा वस्तु संस्थेचे प्रमुख श्री रेडकर यांच्या कड़े सुपुर्द केल्या संस्थेने या दिलेल्या देणगीबद्दल त्यांचे कौतुक करण्यात येत आहे
www.konkantoday.com