कोविड -19 ची लस आठ ते दहा महिन्यांपर्यंत संक्रमणापासून संपूर्ण संरक्षण देण्यात सक्षम -एम्सचे संचालक गुलेरिया
अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) चे संचालक गुलेरिया यांनी शनिवारी सांगितले की कोविड -19 ची लस घेतल्यानंतर आठ ते दहा महिन्यांपर्यंत संक्रमणापासून संपूर्ण संरक्षण देण्यात ती सक्षम आहे. ते म्हणाले की, या लसीचे कोणतेही मोठे दुष्परिणाम समोर आले नाहीत. आयपीएस (सेंट्रल) असोसिएशनने आयोजित केलेल्या कार्यक्रमात गुलेरिया म्हणाले, ‘कोविड -19 ची लस आठ ते दहा महिने आणि कदाचित त्याहूनही अधिक काळ संक्रमणापासून संपूर्ण संरक्षण देऊ शकते.कोवॅक्सीन आणि कोविशिल्ड या उपलब्ध कोविड -19 लसींच्या परिणामकारकतेविषयी बोलताना गुलेरिया म्हणाले, ‘जर आपण दोन्ही लशीवर नजर टाकली तर ती समान अँटीबॉडी तयार करतात आणि खूप मजबूत आहेत.’ दोन्ही लस प्रभावी आणि दीर्घ मुदतीच्या सुरक्षेच्या दृष्टीने तितक्याच प्रभावी आहेत
www.konkantoday.com