आता या ‘एलएनजी’ म्हणजेच लिक्विफाईड नॅचरल गॅसबरोबरच काही गाडय़ांना ‘सीएनजी’ इंधनावर चालविण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला
डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे एसटी महामंडळाने त्यांच्या ताफ्यातील गाडय़ांना एलएनजी इंजिन किट बसविण्याचा निर्णय अलिकडेच घेतला होता. आता या ‘एलएनजी’ म्हणजेच लिक्विफाईड नॅचरल गॅसबरोबरच काही गाडय़ांना ‘सीएनजी’ इंधनावर चालविण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. याबाबतचा प्रस्ताव लवकरच राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवला जाणार आहे.
इंधन खर्च कमी करण्यासाठी एसटी बस एलएनजीवर करण्याचा निर्णय झाला. प्रायोगिक तत्वावर तीन हजार बसचे एलएनजीमध्ये रुपांतर केले जाणार आहे. त्याला मिळणारा प्रतिसाद पाहून पुढील निर्णय घेतला जाणार आहे. आता महामंडळाने डिझेलवरील बस सीएनजीमध्येही रुपांतरीत करण्याचा नवा निर्णय घेतला आहे.
www.konkantoday.com