
दापोली मंडणगड परिसरात मोठ्या प्रमाणावर विनापरवाना वृक्षतोड , वनखात्याचे दुर्लक्ष
लाकूड तोडीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतो. वातावरणाचा समतोल बिघडतो. बेसुमार वृक्षतोडीचा परिणाम अनेक ठिकाणच्या पाणीसाठयावर झालेला दिसतो. यामुळे वन संपदा नष्ट होण्याने जंगली वन्य प्राण्यांच्या अधिवासाचा प्रश्न निर्माण झाला आहे. जंगल कटाईमुळे विविध प्रकारचे हिंस्त्र वन्य प्राणी हे भक्ष्याच्या शोधासाठी आता नागरी वस्तीकडे येऊ लागले आहेत. दापोली आणि मंडणगड तालुक्यात विना परवाना झाडांची बेसुमार तोड होत आहे. रस्तोरस्ती झाडाच्या तोडलेल्या लाकडांचे ढीग साचलेले दिसत आहेत. दोन्हीही तालुक्यातील ग्रामीण भागात झाडे तोडण्यासाठी वन विभागाची परवानगी न घेताच राजरोसपणे झांडाची तोड होत असल्याचे आढळून आले आहे.
www.konkantoday.com