गोवा राज्यातील मद्याची अवैध वाहतूक करणारा टेम्पो लांजा येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाने पकडला ,अठ्ठावीस लाखाचा मुद्देमाल जप्त
गोवा राज्यातील मद्याची अवैध वाहतूक करणाऱ्या एकाला लांजा येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने सापळा रचून ताब्यात घेतले. या कारवाईत मद्याचे २९५ बाॅक्स व मोबाईल असा २८ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मुंबई – गोवा महामार्गावरील लांजा येथे शुक्रवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत दीपक गजानन जोशी (रा. कुणकेरी गावडेवाडी, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग) याला ताब्यात घेण्यात आले आहे.
www.konkantoday.com