कोराेनाच्या पाश्र्वभूमीवर उद्या होणार्या एमपीएससी परीक्षार्थींसह कर्मचार्यांची होणार कोरोना विषयक तपासणी
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) दि. २१ मार्चला रत्नागिरी शहरातील तीन केंद्रांवर दोन सत्रात राज्यपूर्व परीक्षा घेण्यात येणार आहे. परीक्षेला बसणारे उमेदवार, अधिकारी, कर्मचारी आदींना कोरोनाविषयक तपासणीची सक्ती करण्यात आली आहे. परीक्षा केंद्रांच्या १०० मीटर परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम १४४ अन्वये जिल्हा प्रशासनाने बंदी आदेश पारित केले आहेत.
रविवार दि. २१ मार्चला सकाळी १० ते दुपारी १२, दुपारी ३ ते सायंकाळी ५ या वळेत होणार्या परीक्षेला १२९१ उमेदवार बसणार आहेत. गोगटे जोगळेकर महाविद्यालय, पटवर्धन हायस्कूल, फाटक हायस्कुलमधील परीक्षेला बसणार्या उमेदवारांची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे.
उमेदवारांना मधल्या वेळेत परीक्षा केंद्राच्या बाहेर जाण्यास मनाई करण्यात आली आहे. उमेदवारांचा जेवणाचा डबा, अल्पोपहार, पाण्याची बाटली आणण्यास परवानगी देण्यात आली आहे. परीक्षेच्या पर्यवेक्षणासाठी आयोगाकडून विशेष निरीक्षक, भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
www.konkantoday.com