उक्षी, बावनदी पात्रातील गाळ उपसा करण्याची ग्रामस्थांची मागणी
संगमेश्वर तालुक्यातील बहुतांशी नद्यांची पात्रे गाळाने भरल्याने परिसरामधील गावे, वाड्यांना एप्रिल महिन्यापासून भीषण पाटी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. तत्पूर्वी उक्षी, बावनदी पात्रातील गाळ उपसा सुरू करा, अशी मागणी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्याकडे करण्यात आली आहे.
बावनदीच्या किनारी उक्षी गाव वसले आहे. मानसकोंड, वांद्री, परचुरी, करबुडे, लाजूळ, पवारकोंड आदी गावांचा देखील यात समावेश आहे. वाढते नागरिकरण, महामार्ग चौपदरीकरण, रस्त्यांचे रूंदीकरण आदी कामे सध्या सुरू आहेत. अनेक कारणांमुळे बावनदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे.
www.konkantoday.com