विरोधाभास वक्तव्यं सरकारची प्रतिमा खराब करत असून हे सत्ताधाऱ्यांच हप्ता वसुली कांड असल्याचं काँग्रेस नेते संजय निरुपम यांची टिका

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटके असलेली गाडी आढळल्याच्या प्रकरणातील तपासात काही गंभीर चुका पोलिसांकडून झाल्याने आणि या प्रकरणाची चौकशी निष्पक्ष व्हावी यासाठी परमबीर सिंह यांची पोलीस आयुक्तपदावरून बदली केल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी माध्यमांना सांगितले. तर दुसरीकडे शिवसेना मात्र मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरून परमबीर सिंग यांना बदलले म्हणजे ते गुन्हेगार ठरतात असं नाही सांगत त्यांची पाठराखण करत आहे. सचिन वाझे प्रकरणावरुन एकीकडे विरोधक सरकारला कोंडीत पकडत असताना काँग्रेस नेते संजय निरुपम यांनीदेखील घरचा आहेर दिला आहे.विरोधाभास वक्तव्यं सरकारची प्रतिमा खराब करत असून हे सत्ताधाऱ्यांच हप्ता वसुली कांड असल्याचं टीका संजय निरुपम यांनी केली आहे.याचे सर्व धागेदोरे शिवसेनेसोबत जोडलेले आहेत का? अशी विचारणाही त्यांनी केली आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button