राष्ट्रवादी पार्टीतर्फे लवकरच लोटे येेथे चक्काजाम आंदोलन करून संबंधितांना घेराव घालणार

खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील अनेक कंपन्या या अनधिकृतपणे सुरू असून या कंपन्यांमध्ये सुरक्षितेची काळजी घेतली जात नसल्यामुळेच तेथे सातत्याने स्फोटांसारखे गंभीर अपघात घडत आहेत. यात अनेकांचे जीव जात असून अनेकजण कायमस्वरूपी अपंग होत असल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. येथील औद्योगिक क्षेत्रातील अधिकारी कारवाई का करीत नाहीत, असा सवाल करीत या अधिकार्‍यांची संबंधित अनधिकृत कंपन्यांमध्ये हप्तेगिरी असल्यामुळेच हे अपघात वारंवार घडत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, माजी आमदार संजय कदम यांनी करून आपण राष्ट्रवादी पार्टीतर्फे लवकरच लोटे येेथे चक्काजाम आंदोलन करून संबंधितांना घेराव घालणार असल्याचा इशारा देण्यात आला.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button