मोडका आगर पुलाच्या कामाबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दखल घेतली
गुहागर-बिजापूर या राष्ट्रीय महामार्गातील प्रमुख टप्पा असणार्या गुहागर-चिपळूण मार्गाचे व मोडकाआगर पुलाचे संथगतीने काम सुरू असून याबाबत माजी आमदार विनय नातू यांनी केंेद्रीय रस्ते परिवहनमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पत्रव्यवहार केला होता. या पत्राची दखल नितीन गडकरी यांनी घेतली असून संबंधित ठेकेदाराला योग्य ती समज देत हे काम मे २०२१ पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
www.konkantoday.com