मुंबईतील विक्रेत्यांकडून कोकणच्या नावाखाली कर्नाटक हापूसची विक्री
कोकणातून दररोज १० ते १२ हजार पेट्या आंबा वाशी मार्केटमध्ये विक्रीसाठी पाठविण्यात येत आहे. आवक वाढल्याने दर कमी झाला आहे. सध्या हजार ते चार हजार रुपये दराने आंबा पेटीची विक्री सुरू आहे. मात्र, कर्नाटकचा हापूस बाजारात येऊ लागला असून, मुंबईतील विक्रेत्यांकडून कोकणच्या नावाखाली कर्नाटक हापूसची विक्री करण्यात येत आहे. त्यामुळेही कोकणच्या हापूसला दराचा फटका बसला आहे.कोकणच्या हापूसप्रमाणेच कर्नाटकचा हापूस दिसतो. मात्र चव, दर्जा व सालीमध्ये फरक आहेविक्रेते दोन्ही प्रकारचा आंबा विकत घेतात. तुलनेने कर्नाटकचा आंबा जास्त घेतात. दोन्ही प्रकारचे आंबे एकाच वेळी पिकायला ठेवतात. आंबे पिकल्यानंतर ते पेटीत एकत्रित करून भरले जातात. कोकणचा हापूस सांगून कर्नाटक हापूसची विक्री करून पैसे मिळवत आहेत.
www.konkantoday.com