नाणारच्या जमीन खरेदी-विक्री व्यवहारांच्या चौकशीसाठी अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे य़ांची नियुक्ती
नाणार परिसरातील रिफायनरी प्रकल्प अधिसूचित क्षेत्रात झालेल्या जमीन खरेदी व्यवहारांच्या चौकशीसाठी अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
शासन, महसूल व वनविभागाकडील दि. २७ जानेवारी २०२१ च्या पत्रान्वये, जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्याकडील दि. ८ फेब्रुवारी २०२१ च्या आदेशानुसार रद्द झालेल्या नाणार प्रकल्प परिसरातील जमीन खरेदी-विक्री व्यवहारांची चौकशी श्री. शिंदे यांच्यामार्फत केली जाणार आहे.
www.konkantoday.com