
राजापुरातील मोकाट गुरांच्या प्रश्नावर प्रशासनाची उदासीन भूमिका, मुलभूत प्रश्न कायम राहिल्याने जनतेत नाराजी
राजापूर शहर संपूर्ण तालुक्याला भेडसावणार्या मोकाट गुरांच्या प्रश्नी आमदार किरण सामंत यांच्या निर्देशानुसार प्रांताधिकारी डॉ. जैसमिन यांनी काही दिवसांपूर्वी संबंधित अधिकारी वर्गाची घेतलेली बैठक आणि दिलेल्या सूचना अथवा बैठकीत घेण्यात आलेले निर्णय निष्फळ ठरले आहेत. या महत्वाच्या व खास बैठकीतील आदेशांना संबंधित विभागांकडून थेट कचर्याची टोपली दाखवण्यात आल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. गुरांचे शंभर टक्के इअर डंपिंग करून त्यांच्या मालकांची नोंद करण्याचे स्पष्ट निर्देश दिले गेलेले असतानाही त्यावर अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली दिसत नाही. आजही सर्वत्र झुंडने मोकाट गुरे रस्त्यावरच असून या अपघातांना कारणीभूत ठरत असताना प्रांताधिकार्यांच्या आदेशाची प्रशासकीय पातळीवरच थेट अहवहेलना करण्यात येत असल्याचे स्पष्ट होत आहे.
www.konkantoday.com




