इंडिया आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार न केल्याने खेड कॉंग्रेस तालुका अध्यक्षांकडून ६ जणांना कारणे दाखवा नोटीस

रायगड लोकसभा मतदार संघातील इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारापासून अलिप्त राहिल्याचा ठपका ठेवत कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष गौस खतीब यांनी कॉंग्रेसच्या ६ कार्यकर्त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावल्या आहेत. याबाबत रितसर खुलासा करण्याचे सूचित करण्यात आले आहे.कॉंग्रेस पदाधिकारी खलिल सुर्वे, संदीप धारिया, विजय जैन, अजिम सुर्वे, नासर जसनाईक, मंगेश भागवत आदी कार्यकर्त्यांची नावे आहेत. या कार्यकर्त्यांनी लोकसभा निवडणुकीत विरोधकांना मदत केल्याचा ठपका ठेवत प्रचारापासून अलिप्त राहून राजकीय भूमिका पक्षहिताला बाधा आणणारी असल्याने कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येत असल्याचे नमूद केले आहे. यामुळे कॉंग्रेसमधील अंतर्गत वाद आणखी चिखळणार आहे. या पार्श्‍वभूमीवर वरिष्ठ कोणती भूमिका घेतात, याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button