कापरे आरोग्य केंद्रात अधिकारी कर्मचारी यांचा आनंदमेळा उत्साहात संपन्न
चिपळूण तालुक्यातील आरोग्य वर्धीनी प्राथमिक आरोग्य केंद्र कापरे येथे महिला सक्षमीकरण कार्यशाळा, महिलांची आरोग्य तपासणी तसेच आनंद मेळा अंतर्गत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचा शुभारंभ धन्वंतरी पूजन व द्वीप प्रज्वलन रुग्ण कल्याण समिती अध्यक्ष तथा जि. प. सदस्या सन्मा मिनल काणेकर मॅडम यांच्या हस्ते तालुका आरोग्य अधिकारी डॉ ज्योती यादव मॅडम, आरती भुर्के मॅडम यांच्या उपस्थितीत करण्यात आले. हा कार्यक्रम महिला दिनाचे औचित्य साधून केल्यामुळे या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शन करण्या साठी आलेल्या सन्मा. माधवी जाधव महिला सरक्षण अधिकारी यांनी महिला सक्षमीकरण व त्यांच्यावर होणारे अत्याचार या बाबत मार्गदर्शन केले तसेच सन्मा. वर्षा शिंदे मॅडम सहाय्यक पोलीस निरीक्षक चिपळूण यांनी उपस्थित राहून महीलान साठी असलेल्या कायदे व संरक्षन या बाबत मार्गदर्शन केले. या मध्ये उप जिल्हा रुग्णालय कामथे यांचे वतीने डॉ.गवळी सर व कृष्णा इंगळे यानी महिला कर्मचारी यांची ncd अंतर्गत तपासणी केली. या निमित्ताने कर्मचाऱ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले शासनाच्या आदेशा प्रमाणे नियमाचे पालन करून कार्यक्रम घेण्यात आला.हा कार्यक्रम यशस्वी करण्या साठी कापरे आरोग्य केंद्रातील अधिकारी व कर्मचारी यांनी मेहनत घेतली या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. महेंद्र मांडवे गुरुजी यांनी केले शेवटी आरोग्य सहाय्यक श्री परशुराम निवेंडकर यांनी आभार मानले.
www.konkantoday.com