
मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ शिक्षण प्रणालीचा आदर्श राज्यातील इतर विद्यापीठांनी घ्यावा – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत
मुंबई, : राज्यात दूर व मुक्त अध्ययन सुरू करणारे मुंबई विद्यापीठ हे पहिले विद्यापीठ असून याचा आदर्श घेऊन इतरही विद्यापीठांनी दूरस्थ शिक्षण सुरू करावे, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज येथे सांगितले.
मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्यनन संस्थेच्या (आयडॉल) सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त पदवी प्रमाणपत्र वितरण आज संपन्न झाला. या प्रसंगी पदवी वितरण समारंभाचे अध्यक्ष मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. रविंद्र कुलकर्णी हे होते. शैक्षणिक वर्ष २०१९-२० या वर्षात १८ हजार ३२१ विद्यार्थी उतीर्ण झाले असून यामध्ये विशेष प्राविण्य प्राप्त १५ विद्यार्थ्यांना आज प्रातिनिधिक स्वरूपात प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
www.konkantoday.com