राेपवाटिकेतील रक्तचंदनाची तब्बल ४,३४८ राेपे जनावरांनी खाऊन ४ लाख ३४ हजार ८०० रुपयांचे नुकसान, गुराच्या मालकांवर गुन्हा दाखल


राेपवाटिकेतील रक्तचंदनाची तब्बल ४,३४८ राेपे जनावरांनी खाऊन ४ लाख ३४ हजार ८०० रुपयांचे नुकसान केल्याचा प्रकार मंडणगड तालुक्यातील वाकवली येथे घडली. याप्रकरणी मंडणगड पाेलिस ठाण्यात जनावरांच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.राजू ढेबे (रा. धनगरवाडी चिंभाचे, ता. महाड, जि. रायगड) असे जनावरांच्या मालकाचे नाव आहे. याप्रकरणी काेकण वैभव निसर्ग कंपनी प्रकल्पाचे व्यवस्थापक अनिल सावंत (वय ५१, मूळ रा. गाेळपवाडी, निगडी, ता. कऱ्हाड, सातारा, सध्या रा. शेनाळे-साेवेली, मंडणगड) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार हा प्रकार १२ मे २०२५ राेजी दुपारी घडली आहे.

तालुक्यातील वाकवली परिसरात व्ही.बी.पी. कंपनी यांच्यावतीने कोकण वैभव निसर्ग हा प्रकल्प राबविला जात आहे. त्याकरिता रोपवाटिका तयार करण्यात आली आहे. या रोपवाटिकेत मोहगणी, रक्तचंदन, आगरवूड यासारख्या व्यावसायिकदृष्ट्या उत्पन्न देणाऱ्या प्रजातींची रोपे आयात करून मागील चार वर्षांपासून या नर्सरी ती वाढविली जात आहेत. मात्र, दिनांक १२ मे रोजी सहा ते सात मोकाट जनावरांनी या रोपवाटिकेमध्ये घुसून नाव रोपे खाल्ली आहेत.

यासंदर्भात दिनांक १२ मे रोजी मंडणगड पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज देण्यात आला होता. तसेच ग्रामस्थांकडे जनावरांबाबत चाैकशीही करण्यात आली. त्या माहितीनुसार मंडणगड पोलिस ठाण्यात रक्तचंदन या प्रजातीच्या रोपांचे नुकसान केल्याची फिर्याद दाखल करण्यात आली. त्यानुसार २२ जूनला भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ३२४ (५) प्रमाणे राजू ढेबे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button