गुहागर तालुक्यात कुठेही आग लागल्यास प्रशासन स्तरावर एकही अग्नीशामक बंब नाही
गुहागर तालुका हा राष्ट्रीय महामार्गापासून लांब असल्याने नेहमीच दुर्लक्षित राहिला आहे. इतर तालुक्यांना ज्या प्रमाणात सुविधा मिळतात त्या प्रमाणात या तालुक्याला सुविधा मिळविण्यास भरपूर प्रयत्न करावे लागतात. गुहागर तालुक्यात कुठेही आग लागल्यास प्रशासन स्तरावर एकही अग्नीशामक बंब नाही. गुहागर पंचायतीने एक वर्षापूर्वी अग्नीशामक बंबाचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविला होता परंतु हा प्रस्ताव अद्यापही पडून आहे. त्यामुळे या तालुक्यात कोठेह आग लागल्यास रत्नागिरी गॅस आणि विद्युत प्रकल्पाच्या अग्नीशामक दलावर अवलंबून रहावे लागत आहे.
www.konkantoday.com