कोकण संघटनेतर्फे वणवामुक्त स्पर्धेचे आयोजन, १६ गावांचा समावेश, २५ हजाराचा पहिला पुरस्कार
कोकण परिसरात वणव्याचा प्रश्न हा गंभीर प्रश्न असून वणवामुक्त कोकण संघटनेच्या माध्यमातून कोकणातील वणव्याचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या मोहिमेंतर्गत संघटनेतर्फे वणवामुक्त गाव ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यातील प्रथम क्रमांक मिळवणार्या गावाला पुरस्कार ट्रॉफी व २५ हजार रुपये रोख असे देवून गौरविण्यात येणार आहे. तर द्वितीय आणि तृतीय क्रमांकांसाठी देखील रोख बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. या वणवामुक्त गाव स्पर्धेसाठी चिपळुणलगतच्या १६ गावांची निवड करण्यात आली असून त्यामध्ये टेरव, खेर्डी, कळंबस्ते, धामणवणे, कापसाळ, कामथे, कळवंडे, धामणदेवी, पेढे, परशुराम, मिरजोळी, वालोटी, शिरळ, भागाडी, पाचाड, कालुस्ते या गावांचा समावेश असून गावातील पदाधिकारी व ग्रामस्थांनी आपला गाव वणवामुक्त राहिल याची काळजी घ्यावी असे आवाहन समितीचे अध्यक्ष रामशेठ रेडीज यांनी केले आहे.
www.konkantoday.com