दापोली तालुक्यातील ३२ गावांकडे अवैध वाळू व्यावसायिकांची वक्रदृष्टी
दापोली तालुक्यातील निसर्गसौंदर्याने नटलेल्या ३२ गावांकडे अवैध वाळू व्यावसायिकांची वक्रदृष्टी पडली असून वाळूचे डेपो तयार करण्यासाठी संरक्षित कांदळवनाची तोड वाळू माफियांनी केली आहे. सरकारी अधिकाऱ्यांना याबाबत माहिती असूनही ते या प्रकरणाबाबत कोणतीही कारवाई करत नसल्याचे दिसत आहे.
वाळू वाहतूक करणारे डंपर भरधाव वेगाने जात असून या मार्गावरील अवजड वाहनांच्या वाहतुकीने रस्तेही पूर्णत: उखडून गेले आहेत.
www.konkantoday.com