
महाराष्ट्र शासनाच्या वतीने स्वर्गीय यशवंतराव चव्हाण विद्यापीठ निर्मिति मंडळ स्थापन करण्यात येईल-उद्योग व मराठी भाषा मंत्री मा. ना. उदयजी सामंत
लोकमत साहित्य पुरस्कार २०२५ या लोकमत समूहाच्या सलग सहाव्या वर्षी आयोजित मराठी साहित्य क्षेत्रातील प्रथितयश पुरस्कार सोहळ्यास राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री मा. ना. उदयजी सामंत उपस्थित होते.
साहित्य क्षेत्रातील विविध साहित्य प्रकारात उल्लेखनीय साहित्यनिर्मिती करून वाचकांना दर्जेदार साहित्य प्रदान करणाऱ्या साहित्यिकांना यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले.
माझ्या दृष्टीने कार्यक्रम अतिशय महत्त्वाचा होता. याच कार्यक्रमात महाराष्ट्र शासनाच्या वतीने स्वर्गीय यशवंतराव चव्हाण विद्यापीठ निर्मिति मंडळ स्थापन करण्यात येईल आणि त्या मंडळाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांची नियुक्ती होईल, असे मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी जाहीर केले. तसेच, या पुरस्कार सोहळ्यातील सर्व साहित्यिकांची पुस्तके महाराष्ट्र शासनाच्या ग्रंथालयात ठेवण्यात येतील, अशी घोषणाही मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी केली.
पुरस्कार सोहळ्यात पुरस्कारप्राप्त मान्यवर साहित्यिकांनी मराठी भाषेच्या उन्नतीसाठी मांडलेल्या संकल्पना मराठी भाषा मंत्री म्हणून मी निश्चितपणे अंमलात आणेन, असा विश्वास मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी व्यक्त केला. तसेच मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी पुरस्कारप्राप्त सर्वांचे अभिनंदन करून त्यांना मराठी साहित्यात उत्तुंग कामगिरी करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.