
शिमगोत्सवासाठी कंटेन्मेंट झोनमधून येणार असाल तर ७२ तास आधी आरटीपीसीआर किंवा ॲंटीजेन टेस्ट करणे बंधनकारक
शिमगोत्सवासाठी कंटेन्मेंट झोनमधून कुणी येत असेल तर त्यांनी ७२ तास आधी आरटीपीसीआर किंवा ॲंटीजेन टेस्ट करणे बंधनकारक आहे. कंटेन्मेंट झोनच्या बाहेरून जर येत असाल तर ग्रामकृतीदल गावच्या ठिकाणी आपले स्क्रिनिंग करून तपासणी करतील. तपासणीत जर कोणती लक्षणे आढळल्यास पुढील उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात येईल. कोणतीही लक्षणे आढळली नाही तर तुम्ही शिमगोत्सवात सहभागी होऊ शकता, असे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी सांगितले.
www.konkantoday.com