राज्यात कोरोनाची दुसरी लाट आल्यासारखीच ही स्थिती ,केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे राज्य सरकारला पत्र
महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. कोरोनाची दुसरी लाट आल्यासारखीच ही स्थिती आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्य सरकारला तसे पत्रच पाठवले आहे. कोरोना स्थितीबाबत आरोग्य अधिकारी गंभीर नाहीत. पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तीचा शोध आरोग्य यंत्रणा घेत नाही. नाईट कर्फ्यू, वीपेंड लॉकडाऊनसारखे उपायही प्रभावी ठरलेले दिसत नाहीत. त्यामुळे कोरोना संसर्ग रोखण्यासाठी गेल्या ऑगस्ट-सप्टेंबरसारखे कडक निर्बंध लागू करण्याची गरज आहे, असा सल्ला या पत्रात देण्यात आला आहे.
केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना हे पत्र पाठवले आहे.
www.konkantoday.com