राज्यातील थकबाकीदार वीज ग्राहकांची वीज जोडणी तोडू नये, तसेच शंभर युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या ग्राहकांना देयकांत सवलत देण्याची आता काँग्रेसची मागणी
राज्यातील थकबाकीदार वीज ग्राहकांची वीज जोडणी तोडू नये, तसेच शंभर युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या ग्राहकांना देयकांत सवलत देण्याबाबत काँग्रेसने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना साकडे घातले आहे. शिक्षकांच्या वेतन अनुदानाचाही प्रश्न मार्गी लावण्याची मागणी करण्यात आली. मुख्यमंत्र्यांबरोबर या दोन्ही प्रश्नांवर सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, नितीन राऊत, शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांच्याबरोबर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मंगळवारी मुख्यमंत्र्यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. कृषीपंपांची वीज तोडण्याची कारवाई केली जात असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.
त्याचबरोबर काही पिके हाताशी आलेली आहेत, त्यांना पाणी मिळाले नाही तर ती वाया जातील. त्यामुळे या प्रश्नावर काही तरी निर्णय घेणे आवश्यक आहे, असे काँग्रेसच्या वतीने मुख्यमंत्र्यांना विनंती करण्यात आली.
www.konkantoday.Com