या वर्षीचा शिमगा उत्सव शासनाचे नियम व अटी यांचे पालन करुन अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचा सडामि-या ग्रामस्थांचा निर्णय
महाराष्ट्र राज्यामध्ये पसरलेल्या कोरोना महामारीच्या पार्श्वभुमीवर (कोबीड १९) या वर्षीचा शिमगा उत्सव शासनाचे नियम व अटी यांचे पालन करुन अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचे सडामि-या ग्रामस्थांनी ठरविले असून त्यानुसार रविवारदि.२८.०३.२०२१ रोजी श्री नवलादेवी, पावनादेवी व म्हशेश्वर या देवतांची पालखीग्रामप्रदशिणेसाठी व श्री जुगाई देवी , सावंत साळुखे यांचा झाडगांव येथील मूळ चौथरा ,राईतील श्री नवलाई पावणाई मंदीर, रत्नागिरी पोलीस स्टेशन अणि श्री देव भैरी यांचेभेटीसाठी व होळी आणणेसाठी सालाबादप्रमाणे रत्नागिरी शहरामध्ये जाणार आहे. यावेळीदरवर्षीप्रमाणे पालखी रस्त्याने जाताना कोणाचेही ओटी, उलपे, हार, नारळ , पेढे स्विकारलेजाणार नाहीत तसेच ज्या भाविकांना देवीला ओटी, उलपे दयावयाचे असेल त्यांनी सडामि-या मंदिरामध्ये रंगपचंमीपर्यंत पालखी सहाणेवर विराजमान होणार आहे त्यावेळीआणून दयावेत तसेच येताना शासनाने दिलेल्या नियम व अटी यांचे पालन करावे.प्रामुख्याने दर्शनासाठी मंदिरात येणा-या भाविकांनी मास्क परिधान करुन व सोशलडिस्टंसिंगचे पालन करुन दर्शन घ्यावे याची सर्व भाविकांनी नोंद घेवूनदेवस्थानकमेटीस सहकार्य करावे असेआवाहन देवस्थान कमेटी, सडामि-याचेअध्यक्ष श्री दिनेश रामकृष्ण सावंत यांनी केले आहे
www.konkantoday.com