
नैतिक जबाबदारी स्विकारून गृहमंत्री ना.अनिल देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यायला हवा -भाजपा प्रदेश उपाध्यक्ष आमदार प्रसाद लाड
रत्नागिरीः मुंबई पोलीस दलातील अधिकारी दहशतवादी कृत्य करीत आहेत.सचिन वाझे मोठा गुन्हेगार असून सरकार त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करीत आहे. एनआयएने भक्कम पुरावे गोळा केल्यामुळ्ये सरकार अडचणीत आले आहे. गृहमंत्र्यांचे तर तोंड काळे झाले आहे. या घटनेची नैतिक जबाबदारी स्विकारून गृहमंत्री ना.अनिल देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यायला हवा होता. परंतु राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा.शरद पवार यांच्यावरहि मुख्यमंत्र्यांचा दबाव असल्याचा आरोप भाजपा प्रदेश उपाध्यक्ष आमदार प्रसाद लाड यांनी केला.
रत्नागिरीतील शासकीय विश्रामगृह येथे ते पत्रकार परिषदेत बोलत होते. त्यावेळी त्या पत्रकार परीषेदेला अँड.जिल्हाध्यक्ष दिपक पटवर्धन, तालुकाध्यक्ष मून्ना चंवडे, शहरध्यक्ष सचिन करमकर ,जिल्हा प्रसिद्धि प्रमुख उमेश कुळकर्णी उपस्थित होते .
सचिन वाझे प्रकरणात सरकार अडचणीत आले आहे. खंडणीसाठीच सचिन वाझे याने आंबानींच्या बंगल्यासमोर स्फोटकांनी भरलेली गाडी उभी केली होती. राज्य सरकार सचिन वाझेला वाचविण्याचा प्रयत्न करत असताना स्फोटकांमुळे एनआयएने या प्रकरणात लक्ष घालून तपास सुरु केल्याने सचिन वाझे सह राज्य सरकार अडचणीत आले आहे.
या प्रकरणात केवळ सचिन वाझे नसून डीसीपी दर्जाचे दोन अधिकारी व अन्य कर्मचारी यांचाहि समावेश आहे. तेहि लवकरच गजाआड होतील असा विश्वास आ.लाड यांनी व्यक्त केला.
www.konkantoday.com