
देशातील सर्वच राष्ट्रीयीकृत बँकांचे खासगीकरण करण्याचा केंद्राचा विचार नाही -अर्थमंत्री निर्मला सीतारामन
देशातील बँकांनी देशवासीयांच्या आकांक्षा पूर्ण करण्यास सहकार्य करायला हवे, देशाची आर्थिक नाडी बँकांच्या हाती आहे. त्यामुळे राष्ट्राच्या आर्थिक विकासात बँकाच महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात याची जाण केंद्राला आहे. देशातील सर्वच राष्ट्रीयीकृत बँकांचे खासगीकरण करण्याचा केंद्र सरकारचा कोणताही विचार नाही, अशी ग्वाही बँकांच्या देशव्यापी संपावर बोलताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली.
www.konkantoday.com