जिल्ह्यातील सारे नमन कलावंत आता कोकण नमन कलामंचच्या एका झेंड्याखाली

रत्नागिरी जिल्ह्यातील ‘नमन’ या लोककलेला शासनदरबारी राजाश्रय मिळवून देण्यासाठी जिल्ह्यातील सारे नमन कलावंत आता कोकण नमन कलामंच या एका झेंड्याखाली आले आहेत. जिल्हास्तरीय संघटनेची स्थापना करण्यात आली. त्या संघटनेवर जिल्हाध्यक्षपदी प्रभाकर ऊर्फ पी. टी.कांबळे (रत्नागिरी) यांची निवड करण्यात आली. दोन उपाध्यक्षांची निवड झाली असून मोहन घडशी (लांजा) आणि युयुत्सु आर्ते (देवरूख) अशी त्यांची नावे आहेत. इतर पदाधिकारी असे – सरचिटणीस रवींद्र मटकर (राजापूर), चिटणीस संतोष कुळे (चिपळूण), खजिनदार सुधाकर मास्कर (गुहागर) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button