कोराेनाच्या परिस्थितीमुळे लोककलावंतांचे हाल,मार्ग काढण्याचे नामदार उदय सामंत यांना साकडे
करोनाच्या पार्श्वभूमीवर दीड वर्षाहून अधिक काळ रत्नागिरी जिल्ह्यातील नमन, खेळे आदी लोककलावंत तसेच इतर कलाक्षेत्रातील कलाकारांचे कार्यक्रमाविना अक्षरशः हाल झाले आहेत. शासनाच्या विविध नियमावलीमुळे कलाकारांची ससेहोलपट होत आहे. याबाबत उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री तथा रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांची रत्नागिरीतील लोककलावंत, तसेच अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली. आपले गाऱ्हाणे त्यांच्यासमोर मांडून तोडगा काढण्यासाठी साकडे घातले आहे.
www.konkantoday.com