
अति उत्साहात समुद्राजवळ गाडी नेली, आणि गाडी रुतल्यामुळे पश्चात्तापाची वेळ आली
कोकणात येणाऱ्या पर्यटकांना समुद्र किनार्याचे मोठे आकर्षण असते अथांग समुद्र बघितला की पर्यटकांच्या अंगात उत्साह संचारतो वाळूचा मोकळा परिसर दिसला की अनेकवेळा पर्यटक समुद्राच्या जावळ आपली वाहने नेतात परंतु अचानक येणाऱ्या भरतीमुळे किंवा वाळूत रुतल्यामुळे ही वाहने तेथेअडकण्याचा मोठा धोका असतो तरीदेखील उत्साहाच्या भरात पर्यटक अगदी समुद्राच्या किनाऱ्या जवळ वाहने नेतात स्थानिक माणसानी सूचना करूनही हे पर्यटक अनेकवेळा ऐकत नाहीत आजरत्नागिरी शहराजवळील भाट्ये समुद्रकिनारी अशाीच पर्यटकांची गाडी समुद्राच्या वाळूत रुतून अडकली आहे आता गाडी बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत
www.konkantoday.com