सहाय्यक मत्स्य व्यवसाय विभागाची कारवाईचा दणका ,एक हजार नौकांची नोंदणी रद्द
परवाना नसलेल्या मच्छीमारी नौकाना सहाय्यक मत्स्य व्यवसाय विभागाने कारवाईचा दणका दिला आहे
नोंदणीकृत आणि प्रत्यक्षात परवाना घेतलेल्या मच्छीमारी नौकांच्या संख्येत तफावत आढळून आल्यामुळे त्याविषयी सर्वेक्षण मत्स्य विभागाकडून करण्यात आले.यामध्ये एक हजार नौका परवाना न घेतलेल्या आढळून आल्या.त्यामुळे त्यांची नोंदणी सहायक मत्स्य व्यवसाय कार्यालयाकडून रद्द करण्यात आली. त्यानुसार २०१९ पूर्वी नोंदल्या गेलेल्या आणि परवाना घेतलेल्या नौकांचे सर्वेक्षण करण्यात आले.यामध्ये एक हजार नौकांची तफावत आढळून आली.या नौका समुद्रात मासेमारीसाठी जात नाहीत.काही नौका किनाऱ्यावर खराब होऊन बुडालेल्या अवस्थेत आहेत.काहींची कामे निघाली असून त्या बंदरातच पडून आहेत.नोंदणीनंतर एक वर्ष झालेल्या नौकांची यादी निश्चित करण्यात आली . त्या नौकांना मत्स्य विभागाकडून मासेमारीसाठी
परवाने दिले जाणार नाहीत.या नौका रेकॉर्डवरच नसल्यामुळे त्यांना शासनाकडून मिळणाऱ्या परताव्याचे लाभही मिळू शकणार नाहीत.
www.konkantoday.com