रत्नागिरीशहरातील थिबापॅलेस नजिकच्या साईश्वरीअपार्टमेंटमध्ये २१ वर्षीय तरुणाने गळफास लावून आत्महत्या केली
रत्नागिरीशहरातील थिबापॅलेस नजिकच्या साईश्वरीअपार्टमेंटमध्ये अनिकेत चंद्रकांत चाफेकर या२१ वर्षीय तरुणाने गळफास लावून आत्महत्या केलीअनिकेत चाफेकर (२१) हा तरुण आपल्या आई सह साईश्वरी अपार्टमेंट येथे राहत होता. मूळचे खंडाळा येथीलअसलेले कुटुंबीय व्यवसायासाठी रत्नागिरी आले होते.शहरातील मारुती मंदिर येथेअसलेल्या खाऊ गल्लीत चायनीजची गाडी चालवून ताे व्यवसाय करीत होता सोमवारी सायंकाळी नेहमीप्रमाणे अनिकेत आपल्या आई सोबत खाऊगल्ली येथे गेला होता. गाडीवरसाहित्य लावून झाल्यानंतर काहीतरी काम आहेअसे सांगून तो घरीआला. त्यानंतर त्याने घर बंद करून बेडरूममधील पंख्याला साडीच्या साह्याने गळफास लावून आत्महत्या केली.त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप कळलेले नाही
www.konkantoday.com