
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या सर्व विद्याशाखांच्या लेखी परीक्षा दि. १९ एप्रिल २०२१ पासून
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या सर्व विद्याशाखांच्या प्रथम, व्दितीय व तृतीय वर्ष अभ्यासक्रमाच्या लेखी परीक्षा दि. १९ एप्रिल २०२१ पासून घेण्यात येणार आहे. याबाबत सुधारित वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
याबाबत माहिती देतांना विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक यांनी सांगितले की, विविध जिल्हयांमध्ये कोविड-19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता लेखी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. कोविड-19 रोगाचा संसर्ग पसरु नये तसेच अनेक ठिकाणी जाहिर करण्यात आलेली टाळेबंदी व निर्बंधामुळे विद्यापीठाच्या नियोजित परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहेत. विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयांमधील परीक्षार्थींचे आरोग्य सुरक्षित रहावे यासाठी विद्यापीठाने हा निर्णय घेतला आहे.
www.konkantoday.com