आमदार शेखर निकम यांच्या कुशल नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला
गेल्या वर्षभरात संगमेश्वर तालुक्यातील विविध विकासकामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी आणणारे आमदार शेखर निकम यांच्या कुशल नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी नुकताचराष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.
देवरूख पठारवाडीतील भाजपचे प्रमुख पदाधिकारी, गवळी समाजाचे नेते बाळा पंदेरे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षप्रवेश करण्यात आला. शेंबवणे सरपंच सौ. अनुराधा लटके, हातीवच्या माजी सरपंच राजेश्वरी पवार, मुचरीचे उपसरपंच पांडुरंग भोसले, पाटगावचे माजी सरपंच श्रीधर नटे, कुंभारखाणी ग्रामपंचायतीच्या सदस्या अस्मिता खेडेकर, सायली भोजने, प्रकाश भोजने, गजानन टोपरे, बंड्या गवळी आदींनी भाजपला सोडचिठ्ठी दिली.
www.konkantoday.com