आता मोकळ्या जागेवर कचरा फेकणार्यावर नगरपरिषद कॅमेर्यातून नजर ठेवणार
रत्नागिरी शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी रत्नागिरी पालिकेकडून कसून प्रयत्न सुरू आहेत. कचरा उचलण्यासाठी घंटागाडीची सोय केली आहे; मात्र काहीजण गाडी गेल्यानंतर मोकळ्या जागेवर कचरा फेकतात. त्यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी शहरात १२ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा निर्णय पालिकेच्या आरोग्य आणि स्वच्छता विभागाने घेतला आहे. त्यासाठी शहरातील १२ जागा निश्चित केल्या आहेत. पऱ्याची आळी, पटवर्धन हायस्कूलकडे जाणाऱ्या गल्लीत छाया लॉजसमोर, झारणी रोड, आठवडा बाजार शौचालयामागे, मिरकरवाडा पोलीस चौकी, नवीन भाजी मार्केट, कोकणनगर स्वामी समर्थ बंगल्यासमोर, मजगाव रोडवरील शिवाजीनगर स्मशानभूमीसमोर, छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणामागील भाजी मार्केटसमोर, कोकणनगर कदमवाडीसमोर, मारुती मंदिर मच्छीमार्केटमध्ये, झारणी रोड मच्छीमार्केट अशा ठिकाणी कॅमेरे बसवण्यात येणार आहेत
त्याबाबतची निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे.
www.konkantoday.com