
लॉकडाऊनच्या काळातील घरगुती वीज बिले माफ करावीत, या मागणीसाठी शुक्रवारी राज्यभर महामार्ग रोको
लॉकडाऊनच्या काळातील घरगुती वीज बिले माफ करावीत, या मागणीसाठी शुक्रवारी (दि. १९) राज्यभर महामार्ग रोको करण्यात येणार असल्याची घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली. अधिवेशनाच्या सुरुवातीला वीज कनेक्शन तोडणीस स्थगिती द्यायची आणि शेवटच्या दिवशी उठवायची, हा विधिमंडळाचा अवमान आहे. महाविकास आघाडीच्या सरकारने राज्यातील सव्वादोन कोटी ग्राहकांची चेष्टा चालविल्याचा आरोपही त्यांनी केला.
www.konkantoday.com