रत्नागिरी जिल्हा वैश्य समाज सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी विकास शेट्ये यांची पाच वर्षांकरिता फेरनिवड
रत्नागिरी जिल्हा वैश्य समाज सेवा संस्था या संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा दापोली येथील वृंदावन हॉटेलमध्ये संपन्न झाली या सभेला जिल्हाभरातून सभासद उपस्थित होते
सभेच्या प्रथेनुसार सर्व ठराव करण्यात आले आणि 2021 ते 2025 या पाच वर्षासाठी नवीन कार्यकारणी ची निवड करण्यात आली
विद्यमान अध्यक्ष श्री विकास शेटे यांनी आपण दोन वर्ष काम करण्याची संधी दिल्याबद्दल समाज बांधवांचे आभार मानले आणि आता या जागेवर चिपळूण दापोली देवरुख सारख्या शहराने प्रतिनिधित्व करून अध्यक्षपद सांभाळले असे सुचविले
सर्व सन्माननीय सभासदांनी श्री विकास शेटे यांनी केलेल्या कामाची नोंद घेऊन आणि अशा कार्यतत्पर तसेच सर्वांना सोबत घेऊन काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची संघटनेला गरज आहे आणि म्हणून श्री विकास शेटे यांनी याच पदावर पुन्हा काम करावे आणि संघटनेला बळ द्यावे अशी सूचना श्री नंदकुमार थरवळ यांनी मांडली या सूचनेला श्री श्री कृष्ण खेडेकर यांनी अनुमोदन दिले आणि श्री हेमंत शिरगावकर यांनी विकास सारखा माणूसच जिल्ह्याला नेतृत्व देऊ शकतो आणि संघटना बांधु शकतो म्हणून पुढील पाच वर्ष त्यांनी आम्हाला मार्ग दाखवून मार्गदर्शन करावे अशी सूचना मांडली आणि श्री विकास शेट्ये यांच्या नावावर पुढील पाच वर्षासाठी अध्यक्षपद कायम करण्यात आले
संस्थेच्या या सभेत नवीन 125 सदस्यांना सभासदत्व देण्यात आले आणि 31 मार्च पर्यंत 250 सदस्य करावेत असे ठरविण्यात आले
संस्थेच्या उपाध्यक्षपदी श्री हेमंत शिरगावकर चिपळूण आणि सचिवपदी श्री श्री कृष्ण खेडेकर चिपळूण तर खजिनदार म्हणून माधव शेट्टे दापोली यांची आणि महिला जिल्हाध्यक्ष म्हणून पुन्हा सौ स्मिता लाड यांची सर्वानुमते निवड करण्यात आली
मंडणगड दापोली खेड चिपळूण संगमेश्वर रत्नागिरी लांजा राजापूर या सर्व तालुक्यातून प्रत्येकी दोन सदस्य जिल्हा कार्यकारणी मध्ये घेण्यात आले आहेत
अध्यक्षांच्या अधिकारात दापोली येथील डॉक्टर नरेंद्र प्रसादे आणि चिपळूण येथील एडवोकेट नयन वाडकर यांची सल्लागार म्हणून नियुक्त केल्याचे अध्यक्ष विकास शेटे यांनी जाहीर केले
समाजाच्या तळागाळातील कार्यकर्त्यांसाठी सर्व प्रकारची सेवा व सहकार्य करण्यासाठीच या संघटनेची स्थापना करण्यात आली आहे आणि त्याप्रमाणे संघटना कार्यरत राहील मार्च 2022 पर्यंत संघटनेचे एक हजार सभासद होतील अशी आशा श्री विकास शेटे यांनी पुन्हा अध्यक्षपदावर निवड झाल्यानंतर आपल्या मनोगतामध्ये व्यक्त केली तसेच प्रत्यक्ष काम करणारी माणसेच समाज बांधव या कार्यकारिणीमध्ये समाविष्ट करण्यात येतील असे सांगितले
दापोली येथे पार पडलेली ही वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली 2021 ते 2025 या पंचवार्षिक कार्य कालासाठी नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली या सर्व पदाधिकाऱ्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला
दापोली तालुका वैश्य समाज चे अध्यक्ष श्रीराम माजलेकर श्री माधव शेटे श्री प्रकाश बेर्डे डॉक्टर नरेंद्र प्रसादे श्री विकास देवळेकर श्री उदय गांधी तसेच सौ शेटे श्री सुनील प्रसादे यांनी विशेष मेहनत घेऊन ही सभा यशस्वी करण्यासाठी मदत केली त्याबद्दल त्यांचे अध्यक्ष यांनी आभार मानले
पुढील सभा देवरुख येथे घेण्यासंदर्भात श्री संतोष लाड मांडलेल्या सूचनेचा स्वीकार करण्यात आला आणि कार्यकारणीची पुढील सभा देवरूख येथे होईल असे अध्यक्षांनी जाहीर केले
मार्च 2021 पर्यंत सभासद वाढीचे दिलेले उद्दिष्ट सभासद पार पडतील अशी आशा श्री विकास शेटे यांनी व्यक्त केली
कार्यक्रमाच्या वेळी श्री माधव शेटे यांनी सूत्रसंचालन केले तर चर्चेमध्ये श्री राम मजलेकर श्री नंदू शेठ खरवळ श्री श्रीकृष्ण जा गोष्टी श्री संतोष लाड तसेच श्री विद्यानंद खेडेकर श्री सुनील प्रसादे यांनी चर्चेमध्ये सहभाग घेऊन समाजाप्रती आपल्या भावना व्यक्त केल्या आणि या संघटनेचे काम उत्कृष्ट असून आम्ही सर्वतोपरी सहकार्य करू असे आश्वासन दिले
कार्यक्रमाच्या वेळी श्री उमेश कुडाळकर आणि वृंदावन हॉटेल चे मालक श्री भाई कुडाळकर यांनी चांगले सहकार्य केले आणि उत्कृष्ट भोजन दिले त्यांचे आभार
संस्थेचे विद्यमान सेक्रेटरी श्री श्री कृष्ण खेडेकर यांनी संघटनेचा लेखाजोखा सभागृहासमोर मांडला त्यांच्या या कामाबद्दल सर्व समाज बांधवांनी कृतज्ञता व्यक्त करून त्यांचे आभार मानले आणि एकही रुपया खर्च न करता समाजासाठी त्यांनी काम केले म्हणून त्यांचे विशेष आभार मानण्यात आले
संघटनेचे सभासद डॉक्टर नरेंद्र प्रसादे यांनी पीएचडी संपादन केल्याबद्दल त्यांचा अध्यक्ष विकास शेटे यांचे हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला
अध्यक्ष श्री विकास शेटे यांनी नवनिर्वाचित कार्यकारणी चे अभिनंदन केले आणि पुन्हा आपणाला अध्यक्षपदावर काम करण्याची संधी दिल्याबद्दल समाज बांधवांचे आभार मानले
www.konkantodaycom