फाटक हायस्कूलचे शिक्षक व प्रसिद्ध तबलावादक मिलिंद टिकेकर यांचे निधन
रत्नागिरी शहरातील प्रसिद्ध तबला वादक, तसेच फाटक हायस्कूलचे विद्यार्थी प्रिय शिक्षक मिलिंद टिकेकर यांचे आज १५ मार्च रोजी सकाळी दु ख:द निधन झाले त्यांच्या अकाली निधनाने संगीत क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.मिलिंद टिकेकर हे रत्नागिरीत तबलावादक म्हणून प्रख्यात होतेच, याचबरोबर एकसदाबहार, चैतन्यपूर्ण, हसतमुख व्यक्तिमत्त्व म्हणून प्रसिद्ध होते. मनमिळाऊस्वभावामुळे ते सर्वांना प्रिय होते. आज त्यांच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसलाआहे.
त्यांनी अनेक गायक कलाकारांना तबलासाथ केली आहे. तसेच अनेक कार्यक्रमांचेयशस्वी संयोजन केले आहे. रत्नागिरीतील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर ५हजार विद्यार्थ्यांनी “मराठी अभिमान गीत” गाऊन रेकॉर्ड केला होता. आर्ट
सर्कलच्या या संयोजनात त्यांचा सिंहाचा वाटा होता. संगीतकार कौशल इनामदारयांनी याबद्दल त्यांचे विशेष कौतुक केले होते. तसेच त्यांनी अभिनय, दिग्दर्शनातहीआपली छाप पाडली होती. काही संगीत नाटकांत भूमिका करण्याबरोबरच त्यांनी
दिग्दर्शनही केले होते.
www.konkantoday.com