ज्या ठिकाणी रिफायनरी व्हावी अशी लोकमताची मागणी होईल तिथे तो प्रकल्प मंजूर होईल.-खासदार विनायक राऊत
ज्या ठिकाणी रिफायनरी व्हावी अशी लोकमताची मागणी होईल तिथे तो प्रकल्प मंजूर होईल खासदार विनायक राऊत यांनी रत्नागिरी येथे बोलताना सांगितले
नाणार रिफायनरी प्रकल्पाला त्या परिसरातील जनतेचा आजही कडाडून विरोध आहे. ९० टक्के जनता या प्रकल्पाचा विरोध करत आहे. रिफायनरी प्रकल्प नाणार मध्ये होणार नाही. त्यामुळे नाणार रिफायनरिचा विषय पुर्णपणे संपलेला आहे. मात्र राजापूरातील नाणार रिफायनरी समर्थकांना दुःख झालं असावं. आम्ही त्यांच्या दुःखात आम्ही सहभागी नाही आहोत. परंतू नाणार परिसरातील जनतेच्या आनंदामध्ये मात्र आम्ही सहभागी आहोत. ज्या ठिकाणी रिफायनरी व्हावी अशी लोकमताची मागणी होईल तिथे तो प्रकल्प मंजूर होईल. मात्र नाणार मधील रिफायनरी ही लोकांच्या हितासाठी नाही तर जे धनदांडगे भूमाफिया होते त्यांच्या हितासाठी त्यांना नाणार मध्ये रिफायनरी हवी होती. मात्र आता नाणार रिफायनरिचा विषय संपला आहे असे खासदार विनायक राऊत यांनी सांगितले
www.konkantoday.com