
खेड लोटे येथील सुप्रिया केमिकल्स कंपनीत बॉयलरमध्ये स्फोट,दोन जण जखमी
खेड लोटे येथील सुप्रिया केमिकल्स कंपनीत आज सकाळी बॉयलरमध्ये अचानक स्फोट झाला यामध्ये दोन कामगार जखमी झाले त्यांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले त्यातील एकाची प्रकृती गंभीर असल्याने सांगली येथे अधिक उपचारासाठी पाठविण्यात आले आहे हा स्फोट नेमका कशामुळे झाला हे अद्याप कळलेले नाही
www.konkantoday.com