शुटींगची सर्व साधनं उपलब्ध करून देणारी रत्नागिरीतील पहीली कंपनी Kz Creative चं उच्च व तंत्र शिक्षण मंत्री मा. उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन!!
कोकणातील कलाक्षेत्रासाठी खूप विशेष दिवस मानावा लागेल. कारण, कलेच्या परीघवाढीच्या, प्रगतीच्या आणि प्रगल्भतेच्या दृष्टीने एक अत्यंत महत्वाचं पाऊल kZ Creative टीमच्या माध्यमातून उचललं गेलं. ते म्हणजे Kz Creative ह्या Company चं अधिकृत उद्घाटन!. आपले सर्वांचे लाडके “तंत्र व उच्चशिक्षण मंत्री मा. उदयज सामंत सर यांच्या हस्ते फील्मचा क्लॅपर देऊन Kz Creative या कंपनीचं अधिकृत उद्घाटन झालं. यावेळी ते म्हणाले,” kz टीमची ही सर्व मंडळी गेली काही वर्षे कला क्षेत्रात विशेषतः चित्रपट, वेबसिरीज या माध्यमांमध्ये काही करायला धडपडत आहेत त्याला आता एक मुर्त स्वरूप आलं आहे. या कंपनीकडून चित्रपट माध्यमाच्या सर्व गोष्टी इथेच उपलब्ध करून दिल्या जातील. आणि ते स्वतःही नविन कलाकृती निर्माण करतील. आणि महाराष्ट्रातल्या सर्व व्यावसायिक व प्रायोगिक कलामंडळीना मी आवाहन करतो की त्यांनी आता रत्नागिरीत शुटींगसाठी यावं. आणि सर्व स्थानिक कलाकारांनी Kz चे सहाय्य घेऊन अधीक अत्तम काम कराव.”” सोबत त्यांनी Kz चे ब्रीद वाक्य ” Be Creative, Kz Creative हे ही अधोरेखीत केले.
Kz चे प्रमूख प्रदीप शिवगण म्हणाले की ” स्क्रीप्ट पासून ते स्क्रीन पर्यंतची सर्व कामं आता रत्नागिरीतच होतील. म्हणजे अगदी छोट्या शाॅर्टफिल्म पासून ते मोठ्या चित्रपटाला जे तांत्रीक साहीत्य ( कॅमेरा, कॅमेरा इक्वीपमेंट्स, लाईट्स,.. ) लागेल ते इथंच उपलब्ध करून दिलं जाईल. संपुर्ण पोस्ट वर्क ( Editing, Dubbing, DI, CC ) सगळं इथच होईल. आणि Kz स्वतंत्र कलाकृतीही निर्माण करत राहीलच. त्याचाच भाग म्हणजे आमची येऊ घातलेली Commercial Web Series “दिव्यांग”. या सर्वांच्या माध्यामातून Kz टीम ने सर्वांना आवाहन केले की आता सर्वांनी Kz ला जोडून घेऊ आणि सोबतीने पुढे जाऊ .
या उद्घाटनावेळी मा. मंत्री साहेबांसोबत Kz चे प्रमुख प्रदीप शिवगण आणि Kz टीम उपस्थित होती
www.konkantoday.com