
शिरगांव ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सज्ज रहावे, ना. उदय सामंत यांचे आवाहन
उच्च व तंत्रशिक्षणमंत्री ना. उदय सामंत यांनी शुक्रवारी शिरगांव ग्रामपंचायत सदस्य आणि प्रमुख कार्यकर्ते यांच्या बरोबर थेट संवाद साधला. तसेच येणार्या शिरगांव ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले.
यावेळी त्यांनी गावातील सहाही प्रभागात झालेल्या विकासकामांचा आढावा घेतला. तसेच अधिक निधी देण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी नगराध्यक्ष तथा तालुकाप्रमुख बंड्या साळवी, उपजिल्हा प्रमुख बाबु म्हाप, विभाग प्रमुख परेश सावंत, जिल्हा परिषद सदस्य स्नेहा सावंत, सरपंच सौ. रहिमत अलिमियॉं काझी, उपसरपंच अल्ताफ संगमेश्वरी, विभाग प्रमुख दिपक सनगरे, सचिन सनगरे, सदस्य साक्षी कुमठेकर, माजी सरपंच श्रद्धा मोरे, वैशाली गावडे, अभी शिंदे, गणेश भरणकर, अलिमियॉं काझी, बाबु नेरकर, फरहान काझी, शाहनवाज काझी, शाखा प्रमुख शकील मोडक, सिकंदर खान आदी उपस्थित होते.
www.konkantoday.com