चिपळूण तालुक्यात मॉडेल व्हिलेजची संकल्पना राबविण्यात येणार
चिपळूण तालुक्यातील १८ पंचायत समिती गणातील प्रत्येकी एका गावात मॉडेल व्हिलेजची संकल्पना राबविण्यात येणार आहे. पंचायत समिती आणि तालुका कृषी विभागाच्या विविध योजनांचा समन्वय साधून संबंधित गाव कृषीचे मॉडेल बनविण्याचे नियोजन आहे. आजूबाजूच्या पाच-सहा गावातील शेतकरी मॉडेल शेती पाहून, ते स्वतः तशी शेती करतील. प्रयोगशीलतेमधून आधुनिक शेतीला प्रोत्साहन मिळण्यासाठी पंचायत समिती सदस्यांनीच पुढाकार घेतला आहे.
www.konkantoday.com