शिमगोत्सवापूर्वी चाकरमान्यांसह प्रवाशांची गैरसोय टाळा-ऍड. ओवेक्स पेचकर
शासनाचे करोडो रुपये खर्च करून शहरालगत उभारणत येणारे हायटेक बसस्थानकाचे काम गेली कित्येक वर्षे रखडलेल्या अवस्थेत आहे. यामुळे प्रवाशांना एसटी बसकरिता भर उन्हात उभे रहावे लागत आहे. प्रवाशांना होणार्या या त्रासाबाबत मुंबई उच्च न्यायालयाचे वकील व चिपळूणचे सुपुत्र ऍड. ओवेक्स पेचकर आक्रमक झाले आहेत.
या बस स्थानकाचे काम जलदगतीने सुरु करण्याबरोबरच शिमगोत्सवापूर्वी चाकरमान्यांची गैरसोय दूर होण्यासाठी तात्पुरत्या स्वरुपाच्या शेड उभाराव्यात अशी मागणी त्यांनी सोमवारी आगार व्यवस्थापनाकडे केली आहे. आपल्या मागणीकडे दुर्लक्ष झाले तर नागरिकांच्या न्याय हक्कांसाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करावी लागेल, असा इशाराही ऍड. पेचकर यांनी अधिकार्यांना दिला आहे.
www.konkantoday.com