रत्नागिरी जिल्ह्यात वीज मीटरच नसल्याची शोकांतिका -गौस खतीब
महाराष्ट्र इलेक्ट्रीसिटी बोर्ड तथा महावितरण कंपनीच्या नवीन वीज जोडणीसाठी रत्नागिरी जिल्ह्यात वीज मीटरच नसल्याची शोकांतिका पहावयास मिळते. नवीन जोडणीसाठी कोटेशन काढा, पैसे भरा, त्यानंतर महावितरण अधिकारी सांगतात मीटर नाही. जर महावितरणकडे मीटरच नाही तर पैसे भरून का घेतले जातात. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये वीज पुरवठा करणार्या ठेकेदार व अधिकार्यांमध्ये फार मोठा घोटाळा झाला असल्याचा आरोप खेड तालुका कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष गौस खतीब यांनी करून ग्राहकांच्या गैरसाोयीबद्दल आपण लवकरच राज्याचे उर्जामंत्री यांची भेट घेवून तक्रार करणार असल्याची माहिती गौस खतीब यांनी दिली.
www.konkantoday.com