
रत्नागिरी जिल्ह्यातील दाभोळ येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनविभाग व ग्रामस्थांनी दिले जीवदान
रत्नागिरी जिल्ह्यातील दाभोळ येथे भक्षाचा पाठलाग करताना काल रोजी रात्री एक बिबट्या जालगाव मिसाळवाडी येथील अमोल जाधव यांच्या विहिरीत पडला होता.यादव हे विहिरीचा पंप चालू करण्यास गेले असता त्यांना हा प्रकार दिसला याबाबतची वनविभागाला माहिती देण्यात आली वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थांनी त्याला सुखरूप बाहेर काढले. त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार असल्याची महिती दापोलीचे परिक्षेत्र वनाधिकारी वैभव बोराटे यांनी दिली आहे.
www.konkantoday.com




