महाराष्ट्रात गेल्या दोन महिन्यात विविध क्षेत्रात मिळून एकूण ३३ हजार लोकांना नव्याने रोजगार
महाराष्ट्रात मात्र गेल्या दोन महिन्यात विविध क्षेत्रात मिळून एकूण ३३ हजार लोकांना नव्याने रोजगार उपलब्ध करून देण्यात राज्य सरकारला यश आल्याचा दावा राज्याचे अल्पसंख्याक आणि कौशल्यविकास मंत्री नवाब मलिक यांनी केला. देशात अनेक ठिकाणी रोजगारासंदर्भात वाईट स्थिती असताना कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांद्वारे राज्यात जानेवारी आणि फेब्रुवारी २०२१ मध्ये तब्बल ३३ हजार ७९९ उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात आला असल्याची माहिती नवाब मलिक यांनी दिली.
www.konkantoday.com